पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदीमध्ये सौरभ ऐवळे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक तसेच राजकीय कार्याची दखल घेत मोहोळ पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुजित दुर्योधन गायकवाड यांनी सौरभ ऐवळे-पाटील यांची निवड केली. सोलापूर जि.प. सदस्य तथा लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्या हस्ते नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी मोहोळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, पेनुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामदास चवरे, राकेश साळुंखे व संकेत घोगरदरे आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे नुतन सोलापूर जिल्हा सरचिटणीस सौरभ ऐवळे-पाटील म्हणाले की, ‘‘मोहोळ पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी आणि समाजसेवेसाठी मी सतत कार्यशील राहीन. वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवुन दिलेल्या जबाबदारीचे सोने करुन दाखविन. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्य करत असताना विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.’’
सौरभ ऐवळे-पाटील यांच्या निवडीबद्दल विद्यार्थी वर्गामधुन व कार्यकर्त्यांमधुन आनंद व्यक्त होत असुन सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977
0 Comments