
पंढरपूर लाईव्ह- आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या तिरावरील बांधकाम सुरू असलेल्या कुंभार घाटानजीकची एक भिंत कोसळणा-या पावसात ढासळली. या दुर्घटनेत पावसामुळे भिंतीच्या आश्रयाला थांबलेले पाच ते सहा जण ढिगा-याखाली अडकुन पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. ही भीती खरी ठरली असुन बचाव कार्य सुरू असताना 6 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.
मृतांमध्ये पंढरीतील अभंगराव कुटुंबातील चौघांसह दोन वयोवृद्ध बेवारस महिलांचा समावेश असल्याचे समजते.
गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय अंदाजे 78), त्यांची पत्नी राधा गोपाळ अभंगराव (वय अंदाजे 70), त्यांचा मुलगा मंगेश गोपाळ अभंगराव (वय अंदाजे 32) व नातु संग्राम उमेश जगताप (वय अंदाजे 16) या एकाच कुटुंबातील चौघांचा व दोन वयोवृद्ध बेवारस महिलांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दुपारी घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी सचिन ढोले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उप मुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले होते.
ढिगारा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आला असुन. ढिगा-याखाली अडकुन पडल्याने एकुण 6 जणांचा बळी गेला आहे.
0 Comments