स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची जेड ग्लोबल कंपनीत निवड

पंढरपूरः पुणे येथील ‘जेड ग्लोबल’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी दिली.


       पुणे येथील सॉफ्ट्वेअरशी संबंधीत ‘जेड ग्लोबल’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील मानसी ज्ञानेश्वर जगलपुरे, तरन्नुम नौशाद तांबोळी व रोहित लाला कांबळे  या तीन विद्यार्थ्यांची निवड केली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत.

 कंपनीला नेमके कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांना आमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व प्रा.एस.व्ही. दर्शने यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  


छायाचित्र-‘जेड ग्लोबल’ कंपनीत निवड झालेले विद्यार्थी अनुक्रमे डावीकडून मानसी जगलपुरे, तरन्नुम तांबोळी व रोहित कांबळे.


 Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

Post a Comment

0 Comments