पंढरपूर सिंहगडच्या अणुविद्युत व दूरसंचार विभागात "टेक्नोफिलिया अ कोंडिग काॅम्पिटिशन" संपन्न


पंढरपूर: प्रतिनिधी-  कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील अणुविद्युत व दूरसंचार विभागात "टेक्नोफिलिया अ कोंडिग काॅम्पिटिशन" संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमधुन विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास होत असतो. याच अनुषंगाने महाविद्यालयातील अणुविद्युत व दूरसंचार विभागात इटेल्सा तर्फे ऑनलाईन  तंत्रज्ञानाचा उपयोग करून "टेक्नोफिलिया अ कोंडिग काॅम्पिटिशन" घेण्यात आली.
यामध्ये कोडींग व डाटा स्ट्रक्चर यावरील टेक्निकल प्रश्नाचा समावेश होता. यामध्ये विविध महाविद्यालयातील एकुण ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

    या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन कु. वैष्णवी गुलाखे व श्रेया भादुले यांनी केले.  अणुविद्युत व दूरसंचार विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक समन्वयक प्रा. गणेश बिराजदार यांच्या सह अणुविद्युत व दूरसंचार विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 
संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Post a Comment

0 Comments