सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधिक्षकपदी कायद्यावर बोट ठेवून व नियमांना अनुसरून काम करणा-या
तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी त्या आपला पदभार घेतील.
सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची नगरला बदली झाली आहे. त्यांच्या रिक्तजागी आता साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने (बुधवारी) चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
तेजस्वी सातपुते यांच्या सोलापुरातील बदलीनंतर अजयकुमार बन्सल यांची नियुक्ती साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.
कायद्यावर बोट ठेवून व नियमांना अनुसरून काम करणा-या तेजस्वी सातपुते
यांनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत आपले कर्तव्य चोखपणे पार पाडलेले आहे.
सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करु
सध्या कोरोनाचा काळ असून जिल्ह्याला कोरोनातून मुक्त करण्याला प्राधान्य दिले जाईल. ग्रामीण भागातील जनतेला शांतता व सुव्यवस्थेचे प्रशासन देण्यावर भर असणार आहे. दोन दिवसांत पदभार स्वीकारणार असून सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करु. अशी प्रतिक्रिया सोलापूर ग्रामीण च्या नुतन पोलीस अधीक्षक
तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केलीय.
......
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
0 Comments