ऐन बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळीच शेतकरी संघटनांचे विठ्ठल साखर कारखान्यासमोर आंदोलन

आज पंढरपूर तालुक्यातील श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पार पडला. परंतु ऐन समारंभाच्या वेळीच शेतकऱ्यांच्या ऊसाचे थकित एफआरपी बील मिळावे, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख आणि कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गेटवर जाऊन घोषणा देत काळे झेंडे दाखवुन निषेध व्यक्त केला.
पोलिसांनी आंदोलकांना कारखान्याच्या गेटवरच रोखुन अटक केली. यावेळी प्रभाकर देशमुख आक्रमक झालेले आढळून आले. दरम्यान बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळनवर व यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी पहाटेच अटक केले होते. आज दुपारी या सर्वांना सोडण्यात आले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी गोंधळ घालणेची वेळ शेतक-यांवर आली आहे. हा कारखान्याच्या इतिहासातील काळा दिवस आहे. अशी उद्विग्न प्रतिक्रिया यावेळी माऊली हळनवर यांनी व्यक्त केलीय.


 Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह


Post a Comment

0 Comments