अजित पवार हे कोरोनाच्या काळात सतत दौऱ्यांवर होते. विविध ठिकाणी भेटी, मंत्रालयातील बैठका तसेच अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. याच दरम्यान त्यांना काहीसा थकवा जाणवत होता. त्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अजितदादांना दाखल करण्यात आले होते. अजित पवारांची कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती.
त्यानंतर अजितदादांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर उपचाराअंती अजितदादांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज दुपारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अजितदादांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते.
दरम्यान, घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सद्वारे दिली आहे.


0 Comments