Pandharpur Live Online : पंढरपूरच्या कार्तिक यात्रेवर निर्बंध घातले होते. तरीही १४ डिसेंबरला पंढरपूरच्या यात्रेसाठी जानोरी (ता. दिंडोरी) येथील २४ जण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत आले होते. पंंढरपूरच्या यात्रेहून हे सर्वजण आपल्या गावी परतले परंतु हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Advet.
...............
यामुळे दोन दिवसांत गावातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ पर्यंत पोचली आहे.
ग्रामपंचायतीने काळजी घेण्याचे जारी केले पत्र
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून जानोरीच्या सरपंच संगीता सरनाईक आणि ग्रामविकास अधिकारी के. के. पवार यांनी काळजी घेण्यासंबंधीचे पत्र जारी केले आहे.
त्यामध्ये कोरोनाची साथ पसरण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गावातील व्यक्तींनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. महत्त्वाचे काम असल्यास मास्क अथवा रुमाल नाक- तोंडावर बांधावा. शारीरिक अंतर ठेवावे. घरी गेल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावा, असेही पत्रात नमूद केले आहे.


0 Comments