राजकारण नव्हे? खरे समाजकारण! ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा... १ लाख रूपयांचे बक्षिस देवू! DVP समुहाचे अभिजित पाटील यांची घोषणा!

Pandharpur Live- DVP समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक अभिजीत पाटील हे नेहमीच राजकारणामुळे नव्हे तर आपल्या लोकोपयोगी समाजकार्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करणा-या गावाला 1 लाख रूपयांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उचललेलं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद मानलं जातंय. अवघ्या महाराष्ट्राने आदर्श घ्यावा. अशा या विचाराची पेरणी अभिजीत पाटील यांनी केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.


कोरोनामुळे पंढरपूर तालुक्याची खुप मोठी हानी झाली आहे. अजून ही कोरोनाचा धोका संपला नाही. जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने जनसामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे. 

Advet.  

...............

येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतचे नॉमिनेशन फॉर्म भरणे व 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये यासाठी अभिजीत पाटील यांच्यावतीने  पंढरपूर तालुक्यात ज्या बिनविरोध ग्रामपंचायत होतील त्यांना यांच्यावतीने १ लाख रू. बक्षिस म्हणून देण्याची नाविन्या पुर्ण संकल्पना जाहिर केली.हि संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबल्याने सर्व स्थरातून कौतुक होत आहे. 

या काळामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातील वाद विवाद,गट तट बाजूला ठेवत ग्रामपंचायत बिनविरोध करावी. गावातील होतकरू, निर्व्यसनी,योजनाची माहिती असणारे तरूणांनी व सर्व जेष्ठांनी आपल्या गावासाठी सहभागी व्हावे. यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल. राज्यामध्ये शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीन टोकाच्या विचारांचे तीन पक्ष एकत्र येऊन जर सरकार स्थापन करू शकतात तर आपल्याला आपल्या गावामध्ये आपली ग्रामपंचायत बिनविरोध का करू शकत नाही. हि विचार करण्याची बाब आहे.या उपक्रमामुळे पंढरपूर तालुका राज्यासमोर एक आदर्श निर्माण करेल.

Post a Comment

0 Comments