पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची "टेक काम्पोनेंट" कंपनीत मुलाखतीतून निवड


पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची युरोप मधील "टेक काम्पोनेंट प्रा. लि." कंपनीत ७ विद्यार्थांची मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

अभियांञिकीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळत आहे. विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण प्रणाली राबवली आहे. महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चा स्वतंत्र विभाग असल्यामुळे जगातील नामांकित कंपन्या महाविद्यालयात भेट देत आहेत.
     "टेक काम्पोंनेंट प्रा. लि. कंपनी इलेक्ट्रिकल, वाॅटर, गॅस आणि टेलिकॉम, ट्रान्सफॉर्मर आदीसह नवीन आधुनिक उत्पादन मूलभूत सुविधांमध्ये बनविली जातात. सर्वोत्कृष्ट यंत्रणा आणि चाचणी उपकरणांनी सुसज्ज उत्पादन सुविधा "टेक काम्पोंनेंट" प्रा. लि. कंपनीत दिल्या जातात.
    "टेक काम्पोंनेंट" प्रा. लि. कंपनी युरोप मधील कॅहोर्स ग्रुप मधील कंपनी  आहे. अशा या कंपनीत सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील   कृष्णा हाके, शुभम सासवडे, स्मिता क्षीरसागर, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील ञिंबक गायकवाड, वल्लभ कुलकर्णी, अमर मर्ढेकर, गणेश पराडे या ७ विद्यार्थांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली आहे.
    "टेक काम्पोंनेंट" या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे,  डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. सुर्यकांत पाटील आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments