प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यासमवेत प्लेसमेंट प्राध्यापक वर्ग.
पंढरपूर : प्रतिनिधी
मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या “ग्रे अँटम ” या कंपनी मध्ये उद्योग तज्ञांद्वारे तयार केलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगाच्या उच्च-वाढीच्या कारकीर्दीसाठी एक भक्कम पाया देण्यासाठी “ग्रे अँटम ” कंपनी काम करीत आहे. अशा या नामांकित कंपनी मध्ये कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात अभियांत्रिकी शिक्षणाचा उत्तम दर्जा व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असलेले पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोक-या देऊन प्लेसमेंट मध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडे कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण असल्यामुळे पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात निवड होत असल्यामुळे पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील अक्षदा बागल, तृप्ती चव्हाण, ऐश्वर्या ढाळे, स्नेहल गवळी, दिपाली घाडगे, भाग्यश्री घाडगे, मंगेश खरात, स्नेहल लेंडवे, अबोली पाटील, सागर शिनगारे, अपूर्णा सावंत, अरबाज शेख, आकाश सुरवसे, सौदागर थोरात, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील तृप्ती बागल, रुपाली कांबळे, सोनिया नवले, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील स्मिता क्षिरसागर आणि मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील शेखर देठे, रुमा रुपनर आदी विद्यार्थ्यांना कंपनीकडून ४ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ग्रे अँटम कंपनी मध्ये कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड करण्यात आली आहे. “ग्रे अँटम” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
“ग्रे अँटम” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. सुधा सुरवसे, प्रा. अनिल निकम, प्रा. सूर्यकांत पाटील, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. ऋषिकेश देशपांडे, प्रा. भारत आदमिले, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
0 Comments