सिंहगड मध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी च्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

पंढरपूर: प्रतिनिधी :- एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ./ बी. टेक.) व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी  बुधवार दि.३० डिसेंबर २०२० पर्यंत,  एम.ई./ एम.टेक. साठी बुधवार, दि.३० डिसेंबर २०२० पर्यंत अशा स्वरूपात विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला (कॅप रजिस्ट्रेशन) मुदतवाढ देण्यात आली आहे.' अशी माहिती  पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


     दि.०९ डिसेंबर २०२० पासून प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली होती परंतु दि. २२ डिसेंबर ला ती मुदत  संपली होती पण अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाशी संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नसल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये. यासाठी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून व काही अपुऱ्या तांत्रिक बाबीमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकीमध्ये सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा सुरू आहे. या सुविधेचा अभियांत्रिकी प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्रा. सोमनाथ कोळी- 8378017546, प्रा. उमेश घोलप-8055103715, प्रा. टाकळीकर-97651 01510, प्रा जुंदळे- 9403078284 आदी प्राध्यापकांच्या भ्रमणध्वनीवर  संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments