इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे हैराण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक सदस्यांना दिलासा देणारे वृत्त असून उद्या बुधवारी अर्ज भरण्याचा शेवटचं दिवस असला तरीही उद्या ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार असून हि मुदत दुपारी ३ ऐवजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
............. Adv
.............ग्रामपंचायत निवडणुकीच्या नाम निर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबर हि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. परंपरेप्रमाणे इच्छुक उमेदवार हे मुदतीच्या शेवटच्या दोन दिवस आधीच ते भरण्याची घाई करतात. सोमवार पासून जिल्ह्यातील अनेक सायबर कॅफे मध्ये अर्ज भरण्याची गडबड सुरु आहे. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून सर्व्हर डाऊन असल्याने मोठा मनस्ताप राजकीय पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवारांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अजून १ दिवस अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी सगळ्यांकडूनच होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजीही राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारावेत,असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
मुंडे यांच्या निर्देशानुसार 'बार्टी'मार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती करण्यात येत असल्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले.


0 Comments