धार्मिक: चंपाषष्ठी बद्दल सविस्तर माहिती देणारा विशेष लेख

 Pandharpur Live - अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे म्हाळसाकांत प्रभु श्री खंडेराय, यांचे पुजन करण्यासाठी ओळखली जाणारी तिथी म्हणजे चंपाषष्ठी विषयी या लेखात आपण जाणून घेऊया. 

लेखक:- वेदशास्त्र संपन्न पंडीत दामोधर शास्त्री बंडु घेवारे (नाशिक )

मो 9657635011

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहील्या दिवशी मल्हारी नवरात्र ची सुरवात होते व ही नवरात्र सहा दिवसांची असते. सहाव्वा दिवस म्हणजेच चंपाषष्ठी होय. ही नवरात्र भरपूर उत्साहाने साजरी होते .

Advet.  

...............

काही भाविक या मल्हारी नवरात्र मध्ये उपवास करतात. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ला चंपाषष्ठी का म्हणतात? यामागील भगवंताची कथा अशी आहे कि कृतयुगात मणी व मल्ल नावाचे दोन राक्षस होते या राक्षसांकडे भरपूर मायावी विद्या व अस्त्रे होती पण तरी त्यांना आणखी शक्ती हवी होती. त्यामुळे त्या दोन्ही राक्षसांनी ब्रम्हदेवाला प्रसन्न केले ब्रम्हदेव प्रसन्न झाल्यामुळे ब्रम्हदेवांनी त्यांना वर प्रदान केले की, तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही. असे वर दिले. असे वर मिळताच ते उन्मत्त होऊन लोकांचा छळ करू लागले. त्यांचा छळ पाहून ऋषिमुनींनी देवांकडे धावा केला तेव्हा भगवान शंकरांनी मणी व मल्ल यांच्या अत्याचाराचा नाश करण्यासाठी मार्तंड भैरवाचे रूप घेतले. यानंतर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केला तसेच मणी राक्षसाने देवाला शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी रहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान मार्तंड भैरवांनी तथास्तु म्हटले व नंतर मल्ल राक्षसाचा पराभव केला. तेव्हा त्याने शरण जाऊन देवाला विनंती केली की तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे. तेव्हापासून देवांना मल्हारी मार्तंड असे म्हणतात. त्या दिवशी महादेवाने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते म्हणून त्या तिथीला चंपाषष्ठी म्हणतात. या दिवशी काही ठिकाणी १२ बैलगाड्या ओढण्याची प्रथा तर गोंधळ किंवा अन्य काही पूजा करणे अश्या अनेक प्रथा आहेत. ।। जय मल्हार।।

Post a Comment

0 Comments