PSI महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत प्रेमसंबंधातून वाद; पोलिसाचा ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न!

 

Pandharpur Live Online  

पिंपरी - प्रेम संबंधातून महिला उपनिरीक्षकाशी झालेल्या वादातून पोलिस ठाण्यातच पोलिसाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला  सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

अनिल संपत निरवणे असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नावे आहे. निरवणे दिघी पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत.  निरवणे व महिला पोलिस उपनिरीक्षक यांचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, त्यांच्यात अंतर्गत वादविवाद झाले.

त्यातून चिडून निरवणे यांनी उपनिरीक्षक महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देत 1 जानेवारीला रात्री दिघी पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ यावर निर्णय घेतला. मंगळवारी निरवणे यांना निलंबीत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments