स्वेरीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी


 
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी बी.फार्मसी चे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, स्वेरीचे कॅम्पस इनचार्ज प्रा. एम.एम.पवार, अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात,  डॉ.धनंजय चौधरी, प्रा. अविनाश मोटे, प्रा. आशिष जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. करण पाटील, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे डॉ.सचिन सोनवणे, तसेच अमोल रोंगे व बालाजी सुरवसे.

पंढरपूर: येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला बी.फार्मसी चे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. मिथुन मणियार म्हणाले की, ‘भारताच्या जडणघडणीत व स्वातंत्र्यात ज्या महान नेत्यांचे योगदान लाभले त्यांच्यापैकी नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक होते. pagead2.googlesyndication.com  

त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगा’ ही उद्घोषणा केली तसेच भारतभूमी साठी ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात चालवलेल्या असहकार आंदोलनात  नेताजी सुभाषचंद्र बोस ही आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी १९२२ साली स्वराज पक्षाची स्थापना करून विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कोलकत्त्याचे महापौर झाले. त्यानंतर पुढे स्वातंत्र्य लढ्यात व सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा तुरुंगवास भोगावा लागला. एकूणच क्रांतिकारी सुभाषबाबूंनी देशासाठी केलेले योगदान, त्यांची जिद्द व कार्यपद्धत यामुळे युवा वर्गाचे ते मार्गदर्शक ठरले.’ महाराष्ट्राचे महान नेते व हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल बोलताना डॉ. मणियार म्हणाले कि,’ महाराष्ट्रातील मराठी माणसांची अस्मिता जोपासण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. आज महाराष्ट्रातील शासनात शिवसेना पक्ष  हा महत्वाची भूमिका बजावत आहे.त्यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान अतिशय मोलाचे आहे.’ यावेळी बी.फार्मसी चे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, स्वेरीचे कॅम्पस इनचार्ज प्रा. एम.एम.पवार, अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात,  डॉ.धनंजय चौधरी, प्रा. अविनाश मोटे, प्रा. आशिष जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. करण पाटील, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे डॉ.सचिन सोनवणे, तसेच अमोल रोंगे व बालाजी सुरवसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments