पंढरपूर: प्रतिनिधी
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात सद्याच्या परिस्थितीमध्ये सिंहगड शिक्षण समुह प्लेसमेंट मध्ये सर्वाधिक पुढे असुन जगातील नामांकित कंपन्यात चालू शैक्षणिक वर्षांत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या १४३१ विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीतून नोकऱ्या मिळून दिल्या आहेत. सिंहगड समुहाच हा आलेख प्रत्येक वर्षी वाढत असून या सिंहगड इन्स्टिट्युट ने प्लेसमेंट मध्ये उत्तुंग भरारी घेतली असुन यापुढील काळात ही प्लेसमेंट सर्वाधिक करण्याचा मानस असल्याचे प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पिंताबरे यांनी सांगितले.वास्तविक पाहता सिंहगड समुहाचा शैक्षणिक क्षेत्रातील आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. हे सर्व घडत असताना विद्यार्थी केंद्रबिंदू मानुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंहगड समूहातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी काम करीत आहे. या समूहात विद्यार्थ्यांचे मानवी अधिकार, मुलभुत अधिकार अबाधित राखून पालकांच्या विश्वास पाञ ठरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण, गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणजे "सिंहगड समुह" असा वेगळा नावलौकिक सिंहगड संस्थेचा संपूर्ण जगभर गाजत आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, गुणवत्ता पुर्ण आणि दर्जेदार शिक्षण पद्धती, शिक्षणाचा दर्जा, उच्चविद्याभूषित प्राध्यापक वृंद, प्राध्यापकांचा अनुभव व संस्थेचा भविष्यातील दृष्टीकोन, संशोधन प्रक्रिया, उद्योजक क्षेत्रातील वाटचाल या सर्व गोष्टींवर सिंहगड समुह उत्कृष्ट पद्धतीने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात वाटचाल करीत आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानासोबतच समाजाभिमुख ज्ञान देण्याचे काम सिंहगड समुहात केले जाते. देशभरातून विविध नामांकित कंपन्यात सिंहगड समूहातील विद्यार्थी हा ब्रँड म्हणूनच निवडला जातो.
अशा या सिंहगड समूहातून चालु शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये १४३१ हून अधिक विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकऱ्या मिळाल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये सिंहगड ग्रुपच्या १४३१ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली
▶️ टीसीएस कंपनीत- ३९४ (वार्षिक पॅकेज ३.३६ लाख)
▶️ इन्फोसिस कंपनीत- ८३ वार्षिक पॅकेज- ३.६ लाख
▶️ काॅग्निझंट कंपनीत- ३५७ (वार्षिक पॅकेज ४ लाख ते ६.५ लाख)
▶️पर्सिस्टंट कंपनीत- ७५ (वार्षिक पॅकेज-४.५ लाख ते ६.४१ लाख)
▶️ एक्सेंचर कंपनीत- ३०२ (वार्षिक पॅकेज-४.५ लाख ते ६.४१ लाख)
▶️ बिर्लासॉफ्ट कंपनीत- ५२ (वार्षिक पॅकेज ३.६ लाख)
▶️ स्नोफ्लेक्स कंपनीत- १७ (वार्षिक पॅकेज- १०.५ लाख ते १२.५ लाख
▶️ इतर कंपनीत- १५२ हून अधिक
अशा एकूण १४३१ विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्युट मधुन नोकरी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व क्षेञातुन अभिनंदन होत आहे.
0 Comments