शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पंढरपूर लाईव्ह :- हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चातुर्य, चरित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणार्‍या,हिंदवी स्वराज्याच्या दोन दोन छत्रपतींना घडवणार्‍या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त  शिवस्वराज्य युवा संघटनेच्या पंढरीतील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  

 यावेळी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे  शिवस्वराज्य युवा संघटनेचे शहराध्यक्ष किरण शिंदे, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदिप मांडवे, माजी शहराध्यक्ष धनंजय मोरे, छावाचे सोपान काका देशमुख,छावाचे विकी झेंड,रवी देवकर,जगदिश पवार, इब्राहीम बागवान तसेच सर्व पदाधिकारी व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments