Pandharpur Live: पंढरपूर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची मुदत संपली असुन. उद्या बुधवार दि. ६ जानेवारी २०२१ रोजी याची निवड करण्यात येणार आहे. नगरसेवक पदाचे हे शेवटचे वर्ष असल्याने ईच्छुक नगरसेवकांनी यासाठी विविध माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. बांधकाम समिती सभापती पद, पाणीपुरवठा सभापती पद हे पद मानाचे आहेतच तर कोरोनाच्या कालावधी मध्ये स्वच्छता,वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती पद महत्वाचे बनले आहे. या पदावर निवड व्हावी म्हणून अनेक नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समजते पण या पदावर उच्चविद्याविभूषित व या पदावर राहुन काम करण्याची पात्रता असलेला योग्य नगरसेवक असावा अशी कुजबुज पंढरपूर शहरातील नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे. त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट पध्दतीने परिस्थिती हाताळणारे आरोग्य समितीचे विद्यमान सभापती विवेक परदेशी यांना या पदाची पुन्हा संधी मिळते का? की 'राजकारणाचा भाग' म्हणून दुस-या कुणाकडे हे पद जाते? याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागून आहे.
मागील वर्षामध्ये बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट, पाणीपुरवठा समिती सभापती गुरुदास अभ्यंकर, स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, महिला व बालकल्याण समिती सभापती रेहनाताई बोहरी, शिक्षण समीती सभापती रेणुकाताई घोडके यांची निवड करण्यात आली होती. या समितीचे कार्यकाल पुर्ण झाले असुन या नवीन वर्षामध्ये सदर समितीवर कोणाला काम करण्याची संधी मिळेल याकडेही सर्व पंढरपूरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
काहीच दिवसात लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात होणार असली तरी देखील कोरोना परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आली असे म्हणता येणार नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे रूग्ण पुर्णपणे आटोक्यात येई पर्यंत कोमॉरबीड नागरिकांना, साठ वर्ष वया पुढील नागरिक व लहान चिमुकल्यांची काळजी घेणे, त्यांना सुरक्षीत ठेवणे, जनजागृती करणे वेळ प्रसंगी फिल्डवर काम करणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती व अवाहन प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.
आरोग्य समिती सभापती म्हणून नगरसेवक विवेक परदेशी यांनी कोरोनाच्या संकटकाळात ग्राऊंड लेवलला सक्रीय राहुन, अहोरात्र वेळ देऊन प्रसंगी स्वखर्चाने दिलेलं योगदान लक्षवेधी ठरलेले आहे. त्यामुळेच कोरोनाच्या प्रारंभापासून आरोग्य समिती च्या पदाला योग्य न्याय देत कोरोनामुक्तीसाठी झटलेल्या नगरसेवक विवेक परदेशी हेच आरोग्य समिती सभापतीपदासाठी योग्य आहेत व कोरोनाच्या लसीकरण काळात तर त्यांचं या पदावर असणं अत्यावश्यक आहे.
कारण पंढरपूर शहरातील प्रत्येक गल्लीबोळात विविध प्रभागात सर्वेक्षण करण्यासाठी ते स्वतः फिरलेत. आणि लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सक्रीय आणि उच्चशिक्षित आरोग्य समिती सभापती हवाय. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना आढळून येत आहे.


0 Comments