Pandharpur Live Online : मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्याच श्यामाप्रसाद मुखर्जी चौकामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत हे अनावरण पार पडलं. यावेळी पक्षीय मतभेद विसरून सर्वच पक्षातील नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे त्याविषयी राजकीय चर्चा सुरू झाली होती. या दोघांनी एकत्रपणे नेतेमंडळींच्या अभिवादनाचा स्वीकार केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. pagead2.googlesyndication.com
या कार्यक्रमास मंत्री आदित्य ठाकरे, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, छनग भुजबळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासंह राज्यातली सर्वच पक्षाचे प्रमुख नेते व महाविकासआघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती होती.
उद्धव ठाकरे भावूक....
ट्विटरवर अभिवादन
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कृषीमंत्री दादा भुसे, भाजप नेत्या पंकजा मुंडे या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना ट्वीटरवर अभिवादन केलं आहे.






0 Comments