Pandharpur Live Online : मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयाच्या गेटसमोरच एका महिला भगिणीचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना आज गुरूवार दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजणेच्या सुमारास घडलीय.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढ्यातील 60 वर्षीय कोरोनाबाधित महिला पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात जात असताना वेळच्यावेळी उपचार न भेटल्याने रूग्णालयाच्या गेटसमोरंच सदर महिलेचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा शहरातील साठ वर्षीय महिलेने कोरोना तपासणी करुन घेतली. कोरोनाची तपासणी केल्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पुढे तिला जास्तच त्रास जाणवत असल्याने ती पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात जात असताना तिचा रुग्णालयाच्या गेट समोर योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. दरम्यान पोट निवडणुकीनंतर मंगळवेढा तालुक्यात व परिसरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments