Pandharpur Live Online: जगभर कोरोनाचे संकट निर्माण करून जगाला मरणाच्या दारात नेऊन ठेवणाऱ्या चीनने जगावर आणखी एक संकट निर्माण करून ठेवले आहे. चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट The Long March 5B हे या आठवड्यात कोणत्याही क्षणी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. ते कोठे आदळणार याचे नेमके ठिकाण निश्चित नसल्यामुळे ते जगाची डोकेदुखी बनले आहे
काही मीडिया अहवालांनी तज्ज्ञांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, अंतराळात भरकटलेलं हे रॉकेट शनिवारी म्हणजे आजच पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते वातावरणात प्रवेश करण्याआधी जर हे रॉकेट जळालं तर जोखीम कमी होईल. जर अधिक लोकसंख्या असणाऱ्या परिसरात हे रॉकेट कोसळलं तर अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
रॉकेट The Long March 5B ने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. यापूर्वी 1979 मध्ये अमेरिकेचे स्कायलॅबने (अवकाश स्थानक) असाच जगाला ताप दिला होता.
हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर आदळलं तर संपूर्ण मानवजातीचा नाश होऊ शकतो, अशा अफवा पसरल्या होत्या. अखेर ते भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान हिंद महासागरात कोसळले होते.
ऑस्ट्रेलियात त्याचे तुकडे पडले. पण, जिवित हानी झाली नाही. त्याच धर्तीवर The Long March 5B सुद्धा हिंद महासागर किंवा भारतावर कोसळले तर धोका निर्माण होऊ शकतो. ते पृथ्वीच्या कक्षेत येताना नष्ट झाले तर उत्तमच आहे.
29 एप्रिलला चीननं 'लाँग मार्च 5 बी' (Long March 5B ) नावाचं रॉकेट (rocket) लाँच केलं होतं. तज्ज्ञांच्या मते हे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलं असून ते फुटलंय. स्पेस स्टेशन ' Heavenly Palace' साठी आधी हे मोड्यूल लाँच करण्यात आलं होतं.
मीडिया अहवालांच्या मते या रॉकेटची लांबी 100 फूट आहे. या रॉकेटचं नियंत्रण सुटण्याआधी त्याने पृथ्वीभोवती 30 हून अधिक प्रदक्षिणा मारल्या आहेत. एका तासात 28000 मैल अंतर पार करणाऱ्या या रॉकेटचं वजव 21 टन आहे. नियंत्रणाबाहेर गेलेलं हे रॉकेट जरी समुद्रात आदळलं तरी देखील कमी नुकसान होऊ शकतं.
काय होता चीनचा प्लॅन?
या रॉकेटच्या मदतीनं चीन अंतराळात Tiangong (टियानगाँग) नावाचं स्पेस स्टेशन तयार करणार होता. 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. हे स्टेशन पृथ्वीभोवती फेऱ्या मारून अंतराळातील माहिती चीनला पाठवणार होतं. मात्र, आता रॉकेटचं फुटल्यानं चीनचा प्लॅन फसला आहे. फुटलेलं रॉकेट पृथ्वीवर पडून नुकसान होण्याच्या शक्यते बाबत चीनलाही कल्पना आहे. मात्र, अद्याप त्यांनी याची माहिती जाहीर केलेली नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
भारताची तयारी कुठपर्यंत ?
चीनचे हे अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर आदळणार आहे. ते हिंद महासागरात कोसळले किंवा भारतावर कोसळले तर काय करणार ? ते भारतावर कोसळण्यापूर्वी ते नष्ट करण्यासाठी काय उपययोजना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणते उपाय केले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
अंतराळातील घडामोडींचं निरीक्षण करणाऱ्या जोनाथन मॅक्डोवेल (Jonathan McDowell) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचं रॉकेट अंतराळात (space) फुटलं आहे. त्यांचे अवशेष अंतराळात पसरले असून ते वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहेत. या अवशेषांची स्थिती पाहता त्यामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. न्यूयॉर्क (New York), माद्रिद (Madrid), बीजिंग (Beijing), चिली (Chile) आणि न्युझीलंडच्या (New Zealand) काही भागांत हे अवशेष पडू शकतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनचं 100 फुट लांबीचं हे रॉकेट चार मैल प्रति सेकंद इतक्या वेगानं खाली येतंय. याचे तुकडे कुठेही पडून स्फोट (Blast) होऊ शकतो. 29 एप्रिलला चीननं Long March 5B लाँच केलं होतं. याच्या मदतीनं चीनअंतराळात नवीन स्पेस स्टेशन (New space station) तयार करणार होतं.


0 Comments