कोळा /वार्ताहर
सोलापूर जिल्ह्यात त्याचप्रमाणे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांच्या लसीकरणावरही केंद्र आणि राज्य सरकार भर देत आहेत.पत्रकार वार्ताहर यांना दररोज कोरोणाच्या काळात त्यांना बातम्यासाठी जावं लागतं यामुळे सांगोला तालुक्यातील पत्रकारासह राज्यातील पत्रकारांचे तसेच मेडिकल फार्मासिस्ट यांचे कोरोना लसीचे सरसकट लसीकरण तातडीने करावे अशी मागणी राज्य सरकारकडे भाई गणपतराव देशमुख यांची नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले राज्यातील पत्रकारांचे मेडिकल फार्मासिस्ट यांचे लसीकरण करणे महत्त्वाचे असून तातडीने लसीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे एक पत्रच ई-मेलद्वारे पाठवून मागणी केली आहे सध्या तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारनेही त्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी असुन तातडीने अंमलबजावणी करून पत्रकार व मेडिकल फार्मासिस्ट यांना दिलासा द्यावा या मागणीचा राज्यातील पत्रकाराचे लसीकरण करण्याबाबत आता राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जावा अशी विनंती केली आहे कोरोनाच्या संकटकाळात आपण अत्यंत संयमाने काळजी घेत आहात. अनेक लोकोपयोगी निर्णय आपण घेतले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत आहे. एक विषय मात्र आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही धोका आहे.या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे तरी आपण या संदर्भाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा असे माझे मत असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
0 Comments