Pandharpur Live: आर्मी कमांडो विक्रम नाईकनवरे यांचे वडील व पंढरीतील प्रतिष्ठीत जेष्ठ नागरिक राजाराम नाईकनवरे यांचे आज दु:खद निधन झाले.
पंढरपूर शहरातील प्रतिष्ठीत नागरिक म्हणून सुपरिचित असणारे, महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटनेचे माजी उपाध्यक्ष व शिवशंकर वीज कामगार पतसंस्थेचे चेअरमन राजाराम महादेव नाईकनवरे यांचे आज दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
संत पेठ परिसर रमाई नगर येथील सर्वांशी मिळून मिसळून राहणारे सतत हसतमुख व मनमोकळेपणा ठेवून गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जाणारे म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,दोन सून, व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे थोरले चिरंजीव विक्रम नाईकनवरे हे आर्मी मध्ये देशाच्या संरक्षणाचे कर्तव्य बजावत आहेत तर धाकटे चिरंजीव दिपक नाईकनवरे हे प्रसिद्ध कलाकार आहेत.

पंढरपूर लाईव्ह कार्यालयात राजाराम नाईकनवरे व त्यांचे सुपूत्र आर्मी कमांडो विक्रम नाईकनवरे यांचा सत्कार संपादक भगवान वानखेडे यांनी केला होता, तो क्षण.
पंढरपूर लाईव्ह कार्यालयात राजाराम नाईकनवरे व त्यांचे चिरंजीव यांचे सतत येणे जाणे असे. पंढरपूर लाईव्ह चे संपादक यांच्या कामाचे ते सतत कौतुक करत असत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संतपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पंढरपूर लाईव्ह परिवाराकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली.


0 Comments