पंढरपूर - सुस्ते (ता. पंढरपूर) येथील श्रीमती शांताबाई सुखदेव सालविठ्ठल (वय ९४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गोपाळपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल यांच्या मातोश्री होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


0 Comments