पंढरपूर विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य समाधान आवताडे यांना उपाध्यक्षांकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Pandharpur Live: नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. 

मुंबईदि. 12 : विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे यांनी आज विधान भवनमुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

            विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानसभेचे सदस्य आशिष शेलारकॅप्ट. आर. तमिल सेल्वनसंजय केळकरअनिल पाटीलबाळा भेगडेराहुल नार्वेकरविधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक याचबरोबर विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेन्द्र भागवतउप सचिव शिवदर्शन साठ्ये व राजेश तारवी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments