यंदाच्या आषाढी वारीवरही कोरोनाचे सावट... मोजक्या वारकरी भाविकांसोबत 10 महत्वाच्या पालख्या बसमधून येणार

 पुणे, 11 जून: महाराष्ट्रा्ट्राी च श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. पालखीसोबत त्यांना चालत जाता येणार नाही. प्रत्येक पालखीला 2 बसेस असं दहा पालख्यांना 20 बसेस दिल्या जातील.

वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत अनेकांनी पायी वारीसाठी आग्रही मागणी केली होती. अशातच गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

.............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

या पालख्यांच्या प्रस्थानाला परवानगी

  • संत निवृत्ती महाराज ( त्र्येंबकेश्वर )
  • संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
  • संत सोपान काका महाराज ( सासवड )
  • संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
  • संत तुकाराम महाराज ( देहू )
  • संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
  • संत एकनाथ महाराज ( पैठण )
  • रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
  • संत निळोबाराय पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )
  • संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

पालखी यंदाही बस मधूनच पंढरपूरकडे जाणार आहे. लवकरच शासन त्याबद्दल सविस्तर आदेश काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. काला आणि रिंगण सोहळ्याला परवानगी दिली. त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी 15 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी असेल, असंही त्यांनी सांगितलं.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी करणं आवश्यक असणार आहे. तसंत सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही विठुरायाचं मंदिर भाविकांसाठी बंदच असणार आहे. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments