पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट्स ; पुणे विभागातील 15 लाख 45 हजार 785 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त सौरभ राव 


      
 पुणे, दि. 13 : पुणे विभागातील 15 लाख 45  हजार 785 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 28 हजार 984  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  50 हजार 2 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 33 हजार 197 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.04 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.89 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा 
            पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख  30 हजार 863 रुग्णांपैकी  9 लाख 99 हजार 826 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 13 हजार 710 आहे. कोरोनाबाधित एकूण  17 हजार 327 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  96.99 टक्के आहे.
सातारा जिल्हा
              सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 79  हजार 751 रुग्णांपैकी 1 लाख 64  हजार 320 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 661 आहे. कोरोनाबाधित एकूण  3 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
              सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 57  हजार 257 रुग्णांपैकी  1 लाख 49  हजार 985 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 25 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
सांगली जिल्हा
               सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण  1 लाख 29  हजार 389 रुग्णांपैकी  1 लाख 16 हजार 634 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 37 आहे.  कोरोनाबाधित एकूण 3 हजार 718 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा 
            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 31 हजार 724 रुग्णांपैकी  1 लाख 15 हजार 20 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 569 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

.............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये  5 हजार 314 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 421, सातारा जिल्ह्यात 806, सोलापूर जिल्ह्यात  500, सांगली जिल्ह्यात 1 हजार 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 577 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 508 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 611, सातारा जिल्हयामध्ये 908, सोलापूर जिल्हयामध्ये 517, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 4 व कोल्हापूर जिल्हयामध्ये   1 हजार 468 रुग्णांचा समावेश आहे.


विभागातील लसीकरण प्रमाण 
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 30 लाख 18 हजार 123, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 97 हजार 169, सोलापूर जिल्हयामध्ये 6 लाख 24 हजार 879, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 40 हजार 861 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 417  नागरिकांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण  95 लाख 8 हजार  113 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  16 लाख  28 हजार 984 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
                               (टिप :- दि. 12 जून 2021   रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Post a Comment

0 Comments