बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ; शालेय शिक्षण विभाग पाठवणार आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव


 Pandharpur Live Onlin : महाराष्ट्र सरकारने बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात बारावीच्या परीक्षांचा प्रश्न प्रलंबित असल्याने 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

काल मोदी सरकारने सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले होते.

तसेच या संदर्भात आम्ही केंद्राला काही सूचना केल्या होत्या त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.

..............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

आजच्या बैठकीत 12 वीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा झाली. 12 वीची परीक्षा मे एंडपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता कोविडच्या प्रभावामुळं 12 वीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली. आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यानंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत, असं गायकवाड म्हणाल्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर याआधीच राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

सीबीएसई पाठोपाठ काल आयएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल कसा लावणार याबाबत निर्णय लवकरच होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हटलं. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान मोदींनी काल म्हटलं होतं.

Post a Comment

0 Comments