पंढरपूर सिंहगड मध्ये एम.एच.टी. सीईटी-२०२१ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध



पंढरपूर: प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एम.एच.टी. सीईटी-२०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात मोफत ऑनलाईन अर्जांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


     एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना सेवासुविधा देण्यासाठी सज्ज असुन १२ सायन्स विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी एम.एच.टी. सी.ई.टी. २०२१ प्रवेश प्रक्रिया अर्ज भरण्यासाठी दि. ९ जुन २०२१ पासुन सुरुवात झाली असुन ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावयाचे आहे. अशा विद्यार्थ्यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. ७ जुलै २०२१ पर्यंत एम.एच.टी. सी.ई.टी.-२०२१ प्रवेशासंदर्भात अर्ज भरता येईल.

.............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

 कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात सोशल डिस्टनसिंग व सॅनिटायझर वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन एम.एच.टी. सी.ई.टी. २०२१ प्रवेशासाठी अर्ज दाखल भरण्यासाठी संपुर्ण माहिती मोफत दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गातील कागदपञे, मतदान ओळखपत्र अथवा आधारकार्ड, फोटो, १० वी व ११ मार्कशीट तसेच ऑनलाईन अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएम कार्ड सोबत आणावे.

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या ०२१८६२५०१४६ तसेच प्रा. सोमनाथ कोळी-८३७८०१७५४६, प्रा. विक्रांत जुंदळे- ९४०३०७८२८४,
प्रा. रविंद्र टाकळीकर- ९७६५१०१५१०, प्रा. उमेश घोलप- ८०५५१०३७१५
या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments