लायन्स क्लब पंढरपूर मार्फत ६५ एकर कोव्हीड सेंटरमध्ये सुगम संगीत कार्यक्रम संपन्न; कोव्हीड सेंटरमध्ये औषधे, व्हिटॅमिन सी युक्त फळे, सुका आहार वाटप : नुतन लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी

Pandharpur Live : लायन्स क्लब पंढरपूर, नगरसेवक विवेक परदेशी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ६५ एकर भक्तिसागर कोव्हीड सेंटरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी, त्यांच्या मनातील ताण तणाव टेंशन कमी व्हावे या उद्देशाने मनोरंजनासाठी सुगम संगीत कार्यक्रमाचे २९ व ३० में रोजी दोन दिवस आयोजन  करण्यात आले होते. 

पंढरपूरातील प्रसिद्ध गायक रफीक शेख यांच्या सरगम काराओके टिम यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रम पार पडला . सदर कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी आनंद घेतला असुन बरेच कोरोना बाधीत नागरिकांनी नृत्याचा आनंद घेतला व आजचा दिवस आमच्या आयुष्याती खुप चांगला व यादगार दिवस असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली. या दोन दिवसाच्या कालावधी मध्ये आपण एकाच कुंटुंबातील असल्याची भावना निर्माण झाल्याचे कबुल केले व आयोजकाचे मन:पुर्वक आभार मानले. नागरिकांमधील नेमकी गरज शोधून ती पुर्ण करण्याचे काम लायन्स संस्था करत आली आहे. 

..............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

विषेषतः या दुसऱ्या लाटे मध्ये नागरिकांच्या मनामध्ये कोरोना विषयी खुप भिती होती आणी आहे.
अशा वेळी आपण आपल्या मित्र परिवारांना मानसिक आधार देणे खुप गरजेचे असल्याचे नुतन लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले व या दुसऱ्या लाटे मधील सदर गरज ओळखून नागरिकांच्या मनातील भिती दुर व्हावी  यासाठी सदर उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. परदेशी यांनी दोन दिवस पुर्ण वेळ उपस्थीत राहुन, कलाकरांना साथ देउन सर्व उपस्थित नागरिकांबरोबर कार्यक्रमाचा आनंद घेतला.उपस्थित नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी एक मोटीव्हेशनल गाणे ही गायले. सदर उपक्रमासाठी संस्थेचा संग्रहीत केलेला निधी न वापरता अध्यक्ष परदेशी यांनी स्वतः सुगम संगीत कार्यक्रम, अर्सेनीक अल्बम २०० होमिओपॅथिक औषध, सुका आहार व व्हिटॅमिन युक्त फळांचे वाटप सर्व कोरोनाबाधीत नागरिकाना केले व एस.पी.पंढरी न्युज च्या सहकार्यांने युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून सर्व लायन्स सदस्य, पदाधीकारी, समाजसेवक, पंढरपूर व इतर गावातील हजारो नागरिकांनी सदर कार्यक्रमाचा आनंद घेतला.

...............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

          सदर प्रसंगी प्रथम दिवशी युवा नेते प्रणव परिचारक, प्रांत अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, डॉ जानकर, ला.डॉ अमीत गुंडेवार तसेच कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी युवा नेते रोहनजी प्रशांतराव परिचारक, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, यश नागेश भोसले, नगरसेवक जगदीश जोजारे, सिद्धिविनायक विरधे आदी  उपस्थित होते. मान्यवरांनी सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल लायन्स संस्था, नगरसेवक परदेशी व सरगम शोच्या सर्व कलाकारांचे आभार मानले व सर्व कोव्हीड पेशंटना धिर,दिलासा दिला. कोरोनामुक्त झाल्यावरही डॉक्टरांचे सुचने प्रमाने आपण योग्य आहार,विश्रांती, व्यायमावर भर द्यावा असे सांगितले व प्रशासन , लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था सदैव आपल्या सोबत असल्याचे सांगितले व सदर कोव्हीड सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचारी, डॉक्टरांचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments