पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट्स; पुणे विभागातील 16 लाख 46 हजार 44 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 17 लाख 27 हजार 333 रूग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

        पुणे, दि. 4 : पुणे विभागातील 16 लाख 46 हजार 44 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 27 हजार 333 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 45 हजार 314 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 35 हजार 975 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 54 हजार 982 रुग्णांपैकी 10 लाख 26 हजार 712 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 402 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.32 टक्के आहे.

    ...........................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ..................................

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 839 रुग्णांपैकी 1 लाख 82 हजार 230 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 874 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 64 हजार 658 रुग्णांपैकी 1 लाख 58 हजार 147 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 101 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 48 हजार 911 रुग्णांपैकी 1 लाख 34 हजार 911 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 880 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 62 हजार 943 रुग्णांपैकी 1 लाख 44 हजार 44 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 57 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 415 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 387, सातारा जिल्ह्यात 745, सोलापूर जिल्ह्यात 383, सांगली जिल्ह्यात 1124 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 776 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 929 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 345, सातारा जिल्हयामध्ये 690, सोलापूर जिल्हयामध्ये 266, सांगली 

जिल्हयामध्ये 935 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 693 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 87 लाख 6 हजार 903 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 27 हजार 333 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

 

(टिप :- दि. 3 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)


*****

Post a Comment

0 Comments