पंढरपूर सिंहगड मध्ये "वॅप ऑन पायथॉन" उत्साहात संपन्न


पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात "वॅप ऑन पायथॉन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
      पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात २१ जुन ते २५ जुन २०२१ या कालावधीत ऑनलाईन "वॅप ऑन पायथॉन" चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील ४० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
     महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या "वॅप ऑन पायथॉन" मध्ये विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती देण्यात आली. जी माहिती विद्यार्थ्यांना शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी खुप फायदेशीर ठरणार आहे.
   हा कार्यक्रम इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. अभिजित वाडेकर आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ..................................

Post a Comment

0 Comments