Pandharpur Live: सहकाराच्या माध्यमातून परिसराचा विकास व्हावा त्याअनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकाराच्या माध्यमातून प्रगती साधावी याकरीता अनेक जानकार नेते सक्रिय झाले होते , गावोगावी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांची स्थापना करून ग्रामीण भागातील लोकांना कर्जउपलब्ध करुन दिली जात होती , पुढे याच सोसायटींच्या माध्यमातून मदत घेत , तालुका व जिल्हास्तरावर सहकारी तत्त्वावर आधारित साखर कारखाने सुरू करण्यासाठी भाग भांडवल जमा करण्यात आले, त्यासाठी सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील , धनंजय गाडगीळ ,व्यंकटभाई मेहता , यशवंतराव चव्हाण , वसंत दादा पाटील , आदींनी उपाशी पोटी पोटाला चिमटा काढत, रानोमाळ फिरत, भागभांडवल जमा करून सहकार तत्वावर आधारित कारखाने सुरू केले. त्या आधी काही ठिकाणी खाजगी उद्योगपतींनी शेतकऱ्यांच्या जमिनी खंडाने घेऊन त्या जागेवर कारखाने उभे केले होते , त्यासाठी लागणारा कच्चा माल (उस) उपलब्ध व्हावा म्हणून अतिशय अल्प दराने हजारों एकर जमिनी महसूल विभागाच्या मदतीने अल्पशा दरात खंडाने घेऊन तेथे उस लागवड केली जात होती , पुढे त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी या मंडळींनी प्रयत्न करत त्यांच्याकडे असलेल्या कारखाण्यांचे सहकारी साखर कारखान्यात रूपांतर करून सभासदांच्या नावावर कारखाने सुरू झाले.
.......................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
......................
साधारणपणे तिन-चार दशके , सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामिन भागाचा कायापालट झाला हे जरी खरे असले तरी ,२००० साला नंतर मात्र सहकाराला घरघर लागली , पुढील पाच,दहा वर्षांत अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने,सुतगिररण्या बंद पडल्या , कर्जाच्या वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य शिखरं बॅंक ने दहा वर्षापूर्वी च ५० कारखाने विकुन खाजगी उद्योग पतीच्या घशात घातले आहेत , त्यामुळे त्यावर अवलंबुन असलेले सर्वच घटक विकासा पासुन वंचीत राहीले , काही कामगार देशोधडीला लागले ,कर्ज बाजारी झालेले किमान १०० कारखान्याची वसुली पोटी विक्री न करता ते काही काळासाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात यावेत, जनेकरून कारखान्यावर अवलंबून असलेल्या कामगारांची रोजी रोटी चालू राहील ,व सभासदांचे हक्कही अबाधित राखण्यासाठी ,जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे ,मेघा पाटकर ,मा.खा ,राजु शेट्टी ,मा आमदार माणिकराव जाधव यांनी संयुक्तपणे या कारखान्याच्या विक्रिला ण्यायालयात आव्हाहन याचीका दाखल केली ,त्या अनुषंगाने चळवळ उभी करत ८ आक्टोबर २०१३ साली मुंबई येथे आझाद मैदानावर मोठ्या संख्येने साखर कामगार व सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता , त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पुर्तिराज चव्हान यांची भेट देत विक्री झालेल्या कारखान्यां बाबतीत पुनर्रविचार करण्यात येईल असे आश्वासन दिले होते , परंतु ते आस्वासन हवेतच विरुन गेले.त्याही गोष्टी ला ७/८ वर्ष उलटले शिखर बँक च्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली , त्यामध्ये प्रंचड प्रमाणात अनागोंदी व गैरकारभार झाल्याचे अनेक चौकशी अहवालातून बाहेर आले मात्र साखर सम्राटांना वचक बसेल अशि काही ही कारवाई झाली नाही याउलट ज्यांनी हा काळा कारभार उघडकीस आणला त्यांना मात्र प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या ,
याबाबत , समाजसेवक अण्णा हजारे ,का, माणिक जाधव ,मेघा पाटकर ,माखा ,राजु शेट्टी , यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव अभियान राबविण्यात आले ,त्या अनुषंगाने या पुनर्विक्री करण्यात आलेल्या कारखाण्यांची सि बी आय (इ,डी )मार्फत चौकशी करावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रखर जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा समाज सेवकआणा् हजारे यांनी माणिक जाधव यांना लिहिलेल्या पत्रातुन दिला आहे , माणिक जाधव यांनी न्यायालयीन लढाई बरोबर जनआंदोलनही उभं करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की मी अनेक वर्षांपासून सहकार चळवळ वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असुन सहकाराचे रूपांतर स्वा:वाकारात होत असल्याने सहकार क्षेत्राला हळूहळू वाळवी लागुन ते मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत व्यक्त केली आहे.
सहकाराच्या माध्यमातून उभे राहीलेल्या साखर कारखानदारीला लागलेली खाजगी कर्णाचे किड पच्चीम.महाराष्टाबरोबर उत्तर महाराष्ट् ,विदर्भ , मराठवाड्यातील सर्वच ठिकाणी पोहोचले आहे , ज्यांनी कारखाने उभे केले,त्यांच्याच बगलबच्यांनी गैरकारभार करून डबघाईस आणुन बंद पाडले , कालांतराने त्यांनिच कवडीमोल किमतीत विकत घेऊन आपल्या सात पिढ्यांची सोय करून ठेवली आहे , सहकार चळवळीची वाटचाल खाजगी करणाकडे सुरू असुन , खाजगी करणाचा उंट सहाकाराच्या तंबुत घुसला असुन सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा उद्योग सत्ताधारी व विरोधी या दोन्ही गंटानी केलेलं आहे ,येत्या काही काळात सहकाराला लागलेले ग्रहण थांबने गरजेचे आहे ,अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
कळावे
आपला विश्वासु ,
कुबेर जाधव ,अभ्यासक,सहकार आणि शेती
मो.नंबर : ९४२३०७२१०२
0 Comments