....................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
......................
आठवी ते बारावी वर्ग ज्या गावात सुरू करायचे आहेत, त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोरोनाबाधित नसावा. शिवाय, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून आज पुन्हा नव्याने आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.
शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे अशी सूचना दिल्या आहेत . एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
0 Comments