एमपीएससी उत्तीर्ण स्वप्निलच्या आत्महत्येनंतर मातेचा आक्रोश ... "एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, त्याशिवाय मुलगा जाण्याचे दुःख काय असते हे कळणार नाही!''

Pandharpur Live Online: माझा सरकारला तळतळाट लागणार आहे. एखादया मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय त्यांना मुलगा जाण्याचे दुःख काय असते हे कळणार नाही. असा हंबरडा फोडत स्वप्नीलच्या आईने दुःख व्यक्त केले आहे. मंत्र्यांची मुले सुरक्षित आहेत. त्यांना अशा सामान्य मुलांचं काही घेणदेण नाही. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीतून स्वप्नील लोणकर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे आत्महत्या केली. ही घटना 29 जून रोजी घडली.

    ...........................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ..................................

'एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका' असे स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट म्हटले आहे. त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करुनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरुन दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कुटुंबियांशी लोकमतने संवाद साधला.

''गेली दोन वर्षे कोणतीच परीक्षा झाली नाहीये. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांना एक प्रकारचं नैराश्य आलंय. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. आज आपल्यातून एक स्वप्निल गेला. आमच्यावर जे संकट आलंय. ते इतर कुणावर यायला नको", असं स्वप्नीलचे कुटुंबीय म्हणाले.''


सरकारनेच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले

स्वप्नील दोन वर्षांपासून मला सांगत होता. की आई परीक्षेत पास झालो. पण अजूनही मुलाखतीला बोलावले नाही. त्याने खूप प्रयत्नही केले होते. पण यश हाती आले नाही. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग आली असती का? असा प्रश्न स्वप्निलच्या आईने उपस्थित केला. सरकारने दुसऱ्यांच्या आई वडिलांचाही विचार करावा. नुसतं राजकारण करत बसू नये. आम्ही हुशार मुलाला गमावले आहे. सरकारनेच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचही त्या म्हणाल्या आहेत.


Post a Comment

0 Comments