पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आजही राडा... बोलायला ठोस असं काहीच नसल्याने भाजपाची स्टंटबाजी सुरू आहे! - रोहित पवारांची टीका

 



Pandharpur Live Online: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय.

दरम्यान, २२ मार्च २०१७ रोजी तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात अर्थसंकल्पावेळी विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील १९ आमदारांचं ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजे नऊ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा समावेश होता.

    .........................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ................................

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपाने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केल्यानंतर आहे. भास्कर जाधव, नवाब मलिक यांनी भाजपाने भरवलेली प्रतिविधानसभा ही सभागृहाचा अपमान असल्याचं सांगत त्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. दरम्यान विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रतिविधानसभेमधील माईक जप्त करण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले. त्यानंतर भाजपा आमदारांनी विधानसभा परिसरातून बाहेर येत त्यानंतर आता पत्रकार कक्षात प्रतिसभा सुरू झाली केली.

यावरुन रोहित पवारांनी भाजपावर टीका केली आहे.

भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपाने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजात सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर भाजपातर्फे विधानसभेच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवण्यात आली होती. त्यानंतर सभागृहात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याने भास्कर जाधव यांनी विरोधकांना आतमध्ये बोलवण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. अध्यक्षांच्या विनंती नंतरही भाजपातर्फे आंदोलन सुरुच असल्याने सभागृहात यावर या आक्षेपानंतर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. त्यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. अभिरुप सभागृहाजवळ विधानभवनाच्या मार्शल्सने मीडियाला दूर केलं तर भाजपा आक्रमक झाली. त्यानंतर भाजपाने मीडिया स्टँडजवळ जात आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला.

आमदार रोहित पवार यांनी यासर्व गोंधळावरुन भाजपावर जोरदार टीका करत भाजपाला फक्त राजकारण करायचे आहे असे म्हटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत, "सर्वोच्च सभागृहाकडं पाठ फिरवायची, सरकार व मा.अध्यक्षांनी विनंती करूनही कामकाजात भाग न घेता सभागृहाबाहेर गोंधळ घालून खोटेनाटे आरोप करायचे,यावरून भाजपाला फक्त राजकारण करायचं,हे सिद्ध होतं! OBC,मराठा आरक्षण व कृषी कायद्यांवर बोलायला भाजपाजवळ काहीही ठोस नसल्याने हा केवळ स्टंट सुरू आहे!," असे म्हटले आहे.

दरम्यान, पत्रकार कक्षात प्रतिसभा सुरू झाल्यानंतर राज्यात आणीबाणी आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आता धान्य घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली आहे. पीक विमा मिळूच नये असा ठाकरे सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Post a Comment

0 Comments