ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार - आ. आवताडे

 


दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यातील रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम जोमाने राबवून त्यासाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
वाहतूक सोयी - सुविधांचा विकास हाच कोणत्याही भौगोलिक क्षेत्राच्या विकासाचा पाया असतो. माझ्या मतदारसंघात रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम अंतर्गत दळणवळण संकल्पनेस चालना देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईन. असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.

    ..................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ..................

यासंदर्भात काल मंगळवेढा येथे संबंधित जिल्हा परिषद अधिकारी, पंचायत समिती अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली व आढावा घेत निधी वितरण अनुषंगाने उपस्थितांशी विचारविनिमय केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी रस्ते आवश्यक असलेल्या विविध गावांची यावेळी माहिती सादर केली. यावेळी सलगर(बु)- भुयाररस्ता , शिरनांदगी - भुयाररस्ता , सोड्डी - शिवणगी फाटा, सोड्डी फाटा - येळगी, ब्रह्मपुरी - जुना पंढरपूर रस्ता, भालेवाडी फाटा - फटेवाडी रस्ता, घरनिकी - अकोला, लक्ष्मी दहिवडी - देवळे, लक्ष्मी दहिवडी - म्हसोबा देवस्थान , मंगळवेढा - घाटूळे वस्ती, मंगळवेढा - ढवळस, लवंगी - जाडर बबलाद, तळसंगी - हिवरगाव, आंधळगाव - शेलेवाडी, व बठाण कारखाना सदर रस्ते कामास पूर्व मंजुरी देण्यात आली.
 
     या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, माजी सभापती प्रदीप खांडेकर, व्हा. चेअरमन अंबादास कुलकर्णी, संचालक सचिन शिवशरण, पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत ढोणे, माजी उपसभापती विमल पाटील, जि. प. सदस्य मंजुळा कोळेकर, माजी उपसरपंच सतिश मोहिते, माजी सरपंच गणेश गावकरे, जि. प. शाखा अभियंता संजय देशपांडे, उपअभियंता गिरीश वाघमारे, बांधकाम अभियंता एन. डी. कोळी, कनिष्ठ अभियंता बी. एस. खंडागळे, अविनाश मोरे आदी मान्यवर व आधिकारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments