पुणे पोलिस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या 'त्या' व्यक्तीचा अखेर मृत्यू! चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी उचललं टोकाचं पाऊल आणि गमावला जीव....

Pandharpur Live Online: पुणे पोलीस आयुक्तालयात पेटवून घेत प्रवेश करणारे सुरेश पिंगळे यांचा अखेर 80 टक्के भाजल्याने मृत्यू झाला आहे.

त्यांच्यावर दोन दिवसांपासून सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

.................

.......

................

................

.................

सुरेश पिंगळे बुधवारी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आले होते. त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हवं होतं. पण कदाचित त्यांना वेळेवर ते प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी संतापात टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं. इतकंच नाही तर त्या पेटत्या अंगाने त्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली. हा सर्व थरार उपस्थित लोक पाहात होते. त्याचवेळी काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पेटत्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचं धाडस काहींना करता आलं नाही. पण काहींनी ते धाडस करुन, आग विझवली. त्यानंतर सुरेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दोन दिवसांच्या उपचारानंतरही सुरेश यांची प्राणज्योत मालवली. या सर्व थरारानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments