मा.आमदार स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त कर्मयोगी व्याख्यानमाला


 

Pandharpur Live Video News Updates

.....................

..........................
....................
.......................
......................

पंढरपूर,  मा. आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा प्रथम स्मृतिदिन दि.१७ऑगस्ट रोजी आहे. या निमित्त कर्मयोगी इंजिनिअरींग व पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आभासी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेला अध्यक्ष या नात्याने जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक व प्रमुख उपस्तीथी रोहन परिचारक यांची असणार आहे.

सदर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि. १७ऑगस्ट रोजी मा. लक्ष्मणराव ढोबळे सर हे “मालकांचा कर्मयोग” या विषयावर गुंफणार आहेत, तर दुसरे पुष्प दि.१८ऑगस्ट रोजी . विवेक घळसासी हे “युवक : समाज आणि संस्कृती” या विषयावर गुंफणार आहेत आणि तिसरे व शेवटचे पुष्प चैतन्य महाराज देगलूरकर हे “कर्मातील ज्ञानयोग” या विषयावर गुंफणार आहेत, 

.................

अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील यांनी दिली. कर्मयोगी व्याख्यानमाला ही मोठ्या मालकांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आयोजित केली जाणार असून दरवर्षी व्याख्यानमाला ही एका थीमवरती आधारित असेल. या वर्षीची व्याख्यानमाला 'स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे सामाजिक जीवन' या थीमवर आधारित आहे अशी माहिती कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए.बी.कणसे यांनी दिली. 

कर्मयोगी व्याख्यानमाला ही Youtube(https://www.youtube.com/c/KarmyogiEngineering) आणि Facebook (https.//www.facebook.com/kecsp) या वेबसाइट लिंकवरती दि. १७,१८ व १९ऑगस्ट रोजी सायं. ६.०० ते ७.०० यावेळेत लाईव्ह होणार आहे.

सदर व्यख्यानमालेच्या तांत्रिक बाबी प्रा.दीपक भोसले हे हाताळणार असून समन्वयक म्हणून प्रा. संदीप सावेकर काम पहात आहेत.

Post a Comment

0 Comments