
Pandharpur Live: पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येप्रकरणी सरजी गॅंगमधील फरार आरोपी सुनील वाघ याला पंढरपूर पोलिसांनी मैसूर येथून शुक्रवारी ताब्यात घेतले. नगरसेवक संदीप पवार यांची २०१८ रोजी स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेल मध्ये गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यातील आरोपी सुनील वाघ हा फरार होता. मागील ५ वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

आरोपी सुनील वाघ हा कर्नाटकातील म्हैसूर येथे नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलिस सूत्रांना मिळाली. या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पंढरपूर पोलिसांनी सुनील वाघ याचाठावठिकाणा शोधून काढत शुक्रवारी सुनील भागवत सचिन देवमारे या दोघांना ताब्यात घेतले आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम आणि पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम, पो. हे. कॉ. शरद कदम, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, पोकॉ सुनिल बनसोडे, सुजित जाधव, विनोद पाटील यांनी केली.


0 Comments