कर्ज काढून लेकाचं लग्न केलं... नववधु बनून घरी आलेल्या नव्या सुनबाईनं एवढं छळलं की कंटाळून सासऱ्याने मृत्यूलाच कवटाळलं!



Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ

.................

.................

.....................

Pandharpur Live Online: ट्रॅक्टर वर्कशॉपमध्ये चौकीदारी करणाऱ्या एका सद् गृहस्थाने बचत गटाचे कर्ज काढून लेकाचं लग्न धुमधडाक्यात केलं, परंतु लग्नानंतर नववधु बनून घरात आलेल्या सुनेनं सास-याला एवढं छळलं की सुनेच्या जाचाला कंटाळून अखेर या सद् गृहस्थाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.

याबाबत ची हृदय हेलावून टाकणारी यवतमाळ मधील बातमी.

यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप येथे घडली. मृत्यूपूर्वी सासऱ्याने एक चिट्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला. साहेबराव दवणे (वय 65, राहणार पंचशील नगर लोहारा) असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

साहेबराव दवणे हे आपला मुलगा सून हिच्या बरोबर एकत्र राहत होते. ते एका ट्रॅक्टर वर्कशॉपमध्ये चौकीदारी करत होते. त्यांनी 4 बचतगटाचे कर्ज उचलून मुलगा सूरजचा विवाह नांदेड येथील संध्या हिच्याशी लावून दिला. संध्या लग्नानंतर नवीन सून बनून घरात आली. मात्र त्यानंतर तिने वृद्ध सासऱ्याला घालून पाडून बोलण्यास सुरुवात केली. लग्नासाठी काढलेला कर्जाचा हप्ता नवऱ्याने भरू नये यासाठी नवऱ्यावर दबाव टाकत होती.

 सासऱ्याला अश्लील शिवीगाळ... जेलमध्ये टाकण्याची धमकी

सून संध्या सासऱ्याला अश्लील शिवीगाळ करत जेलमध्ये टाकण्याची धमकी देत होती. यामुळे साहेबराव दवणे यांना मानसिक धक्का बसला. या धक्क्यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिट्ठी खिशात लिहून ठेवली. या चिट्ठीवरून त्यांचा मुलगा सुरज साहेबराव दवणे याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी संध्या सूरज दवणे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.


Post a Comment

0 Comments