खळबळजनक ... निकाल जाहीर करा, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ ! मुंबई विद्यापीठाला ई-मेल वरून धमकी


 Pandharpur Live Video News Updates

.....................
....................

.......................
......................

 मुंबई विद्यापीठाला पदवीपूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी करणारे अनेक ई-मेल प्राप्त झाले असून लवकरात लवकर विद्यापीठाने निकाल जाहीर केले नाहीत, तर विद्यापीठ बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांच्या मते, त्यांना बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए), बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) आणि बॅचलर ऑफ कॉमर्स (बीकॉम) च्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास सांगणारे बॉम्ब धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत.

याप्रकरणी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. ज्या सिस्टमवरून हे ई-मेल पाठवण्यात आले, त्याचा आयपी एड्रेस शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठाने जुलै महिन्यात बीकॉम आणि बीएससीच्या अंतिम वर्षाच्या सेमिस्टरचे निकाल जाहीर केले. कोरोनामुळे परीक्षा घेण्यास आणि निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाला तुलनेने बराच वेळ लागला होता.

मुंबई विद्यापीठाने पोलिसांना कळवले

सलग तीन दिवस धमकीचे मेल आल्यानंतर मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठात प्रथमच सर्व शैक्षणिक विभागांसाठी केंद्रीकृत प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात 12 ऑगस्टपासून झाली आहे. पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपली उत्सुकता दर्शविली आहे. अंतिम गुणवत्ता यादी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठात आलेल्या धमकीच्या मेलमुळे विद्यापीठ प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Post a Comment

0 Comments