संबंधित 15 वर्षीय मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून, तीन महिन्यांपूर्वी पुलाची शिरोली येथील मावशीकडे ती राहण्यासाठी गेली होती. 30 जून, 1 व 2 जुलै या काळात मावसभावानेच तिचे लैंगिक शोषण केले होते. 'याबाबत कोणालाही सांगू नको,' अशी धमकी त्याने दिली होती. भीतीपोटी पीडितेने या घटनेची कोणालाही माहिती दिली नाही.
दोन महिन्यांनंतर तिला त्रास जाणवू लागल्याने आईने उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. तेथील महिला डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या आईला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, बदनामीच्या भीतीने सत्य लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीला होणारा त्रास वाढल्याने त्यांनी अखेर घडलेली घटना पोलिसांना सांगितली. कागल पोलिसांनी या प्रकरणाची सत्यता तपासून अखेर तिच्या मावसभावाला 'पोक्सो' कायद्याअंतर्गत अटक केली आहे.
0 Comments