
ही कारवाई पोलीस उप-अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश मोरे, पो.हे.कॉ. शैलेश पोरे,पो. ना. विकास माने, पो. ना. सुनिल घोसाळकर, पो. कॉ. रूपेश माने यांनी केली. या प्रकरणात तात्योसा धनपाल सावंत (38) याला लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या. या प्रकरणात महिला मंडलअधिकारी अर्चना मिलिंद गुळवणी (47) आणि त्यांचा कोतवाल युवराज कृष्णात वड्ड (35) या दोघांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे तिघांना अटक करण्यात आली.

तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमीनीला हरकत घेण्यात आली होती. ही हरकत निकाली काढून तक्रारादाच्या बाजूने निकाल दिल्याचे सांगून वसगडे गावचा कोतवाल तात्यासो सावंत आणि गडमुडशिंगीचा कोतवाल युवराज वड्ड या दोघांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोड झाल्यानंतर 25 हजार रुपये देण्याचं ठरलं.

दरम्यान संपूर्ण पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानंतर बुधवारी 1 सप्टेबर रोजी तात्यासो सावंतला रंगेहाथ पकडलं. लाच घेण्यास अर्चना गुळवणी यांची संमती असल्याचे समोर आलं. त्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.

0 Comments