संग्रहित छायाचित्रं
Pandharpur Live Online: "तुझ्या गर्भात वाढणारे मूल माझं नाही, मला ते नकोय, तु ते काढून टाक", असे म्हणत पोलीस उपनिरीक्षक असलेल्या पतीने गर्भवती पत्नीच्या पोटावर जोरात लाथ मारल्याच्या गुन्ह्याखाली सदर पोलीस उपनिरीक्षक पतीवर पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारी नुसार, सात जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी २०२० मध्ये मुंबई मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आरोपी पतीसोबत कुर्डुवाडी येथे विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी आपल्या पत्नीला मुंबई येथे घेऊन गेला. तेथे कित्येक दिवस पत्नी सोबत आनंदाने राहिला. त्यानंतर, महिलेच्या सासू, सासरे, दीरानी छोट्या-छोट्या कारणांवरून तिचा छळ करण्यास सुरुवात केली तिला रोजच उपाशी ठेवू लागले. दरम्यानच्या काळात दिराने वाईट हेतूने महिला पीडितेचा विनयभंग केला. पतीने पत्नीला सोलापूर येथे माहेरी सोडून जाताना पीडितेच्या आई-वडिलांना शिवीगाळ देखील केली.
दरम्यान, लग्नाच्या वेळी मध्यस्थी करणाऱ्या चुलत सासऱ्यानेही त्यावेळी विविध जाचक अटी-शर्ती घातल्या. या आशयाची फिर्याद पीडित महिलेने सोलापुर पोलीस ठाण्यात दिली आहे.
हे मूल माझे नाही, तुझे कोणाबरोबर तरी लफडं आहे, असे म्हणत पिदितेच्या चारित्र्यावर संशय घेत, पीडितेचा गळा दाबून आरोपीने तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गर्भवती पत्नीच्या पोटावर जोरात लाथ मारल्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात देखील झाला आहे. त्यानंतर, पतीने पत्नीला सोलापूर येथे माहेरी आणून सोडले.
0 Comments