पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर
Pandharpur Live (संभाजी गोसावी) दहिवडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांची शिरवळ पोलिस स्टेशनला बदली झाली असुन लवकरच नुतन पोलिस निरीक्षक म्हणून संतोष तासगांवकर आपला कार्यभार स्वीकारतील.

श्री. भुजबळ गेल्या दोन वर्षासुन दहिवडी पोलिस स्टेशनचा कार्यभार पाहत होते . त्यांची कोरोनाकाळातील कामगिरी उत्कृष्ट ठरली. त्यांचा कार्यकाळ पुर्ण होताच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांची नियुक्ती शिरवळ पोलिस स्टेशनला केली आहे.

त्यांच्या जागी सहायक वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर पदभार स्विकारणार आहेत. कायदा व सुव्यस्था अबाधीत राहण्यासाठी अट्टल गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यावर भर देईन. अशी भुमिका आपल्या भावना करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री . तासगांवकरांनी व्यक्त केल्या.



0 Comments