राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष वै.राजुबापू पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ५० विणेकऱ्यांना वस्त्रदान करून सन्मान करण्यात आला हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी श्री संत गोरोबाकाकांचे मठात काढले. श्री संत गोरोबाकाकांचे मठात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे सर होते.

प्रारंभी ह.भ.पसुधाकर महाराज इंगळे, ह.भ.प.राणामहाराज वासकर,ह.भ.प.चैतन्य महाराज देहुकर,ह.भ.प.भागवत महाराज चवरे,ह.भ.प.महेश महाराज बागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष युवराजदादा पाटील,शिवसेना नेते महेश साठे,काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ॲड.राजेश भादुले,पत्रकार शिवाजीराव शिंदे सर,राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले,सारिका गायकवाड, जि.प.सदस्य खरात,ओ.बी.सी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी आदी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी बोलताना इंगळे महाराज पुढे म्हणाले की ,वै.राजुबापू पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त सांप्रदायाचा अधिष्ठान मानुन विण्याची सेवा करणाऱ्या सेवाधारी मंडळींना वस्त्रदान करून सन्मान केला गेला याबद्दल राष्ट्रवादी का़ँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीरआबा भोसले यांचे धन्यवाद मानले.
याप्रसंगी अध्यक्षस्थाना वरून बोलताना जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे यांनी वै.राजुबापू पाटील यांचे जुन्या आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रारंभी ह.भ.प.राणा महाराज वासकर,ह.भ.प.देहुकर महाराज,ह.भ.प.चवरे महाराज,ॲड.भादुले यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे हस्ते सर्व ५० विणेकऱ्यांना वस्त्रदान करून सन्मान करण्यात आला. प्रारंभी युवराज सुधीर भोसले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिध्दी प्रमुख विजय काळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर कार्याध्यक्ष रणजित पाटील,युवराज सुधीर भोसले,उपाध्यक्ष गिरीष चाकोते.सचिन कदम,सचिव.सचिन आदमिले,सरचिटणीस दत्तात्र माने,रशिद शेख,कार्य.सदस्य प्रा.विजय गायकवाड,नवनाथ मोरे आदी पदाधिकांऱ्यांनी परिश्रम घेतले.
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार गिरिष चाकोते यांनी मानले.



0 Comments