केंद्र सरकार दबावतंत्राच्या वापराने राज्यातील वातावरण बिघडवतय; केवळ महिला घरात असताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांची घरात घुसून चुकीची कारवाई !- खासदार सुप्रिया सुळे

Pandharpur Live Online:  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही  संताप व्यक्त केला आहे. 'आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, मात्र केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे. केवळ महिला घरात असताना देशमुख यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली हे चुकीचं आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 'यापूर्वी अशाप्रकारची दडपशाही मी पाहिलेले नाही. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते ती कशी केली जाते? सुडाचं राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणारं नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देश चालायला हवा, ते महाराष्ट्रात होताना दिसत नाही. पण आम्ही याच्याविरोधात पूर्ण ताकतीने लढू', असेही त्या म्हणाल्या आहेत.



सीबीआयने २० मिनिटे चौकशी करून चतुर्वेदी यांना सोडून दिले. त्यानंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतले. तसेच सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळाले. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.



अनिल देशमुख यांच्या जवायचं आपहरण झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगितलं जातंय. गौरव चतुर्वेदी यांच कुटूंब वरळी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलंय. गौरव चतुर्वेदी यांच अपहरण झाल्याचा आरोप आहे.

Post a Comment

0 Comments