माझ्या पतीला मारून मलिक ३२ वर्षे फिरत राहिला त्याला आणखी काय हवे ...



 दिल्लीच्या विशेष एनआयए न्यायालयाने यासिन मलिकला (Yasin Malik) टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावली आहे. तसेच दहा लाखांचा दंडही ठोठावला आहे. यासिन मलिकला दोन खटल्यांमध्ये जन्मठेपेची आणि पाच प्रकरणांमध्ये दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

यासिन मलिकच्या दहशतीचा बळी ठरलेल्या हवाई दलातील चार अधिकाऱ्यांपैकी एक स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना यांच्या पत्नीला अजूनही यासिन मलिकची शिक्षा मान्य नाही. माझ्या पतीला मारल्यानंतरही तो ३२ वर्षे फिरत राहिला त्याला आणखी काय हवे, असा प्रश्न टीव्ही चॅनलशी संवाद साधताना त्यांनी उपस्थित केला. (Ravi Khannas wife angry over Yasin Malik punishment)



यासिन मलिकने (Yasin Malik) पाकिस्तान या दहशतवादी देशात मास्टर हाफिज सईदच्या मदतीने खोऱ्यात दहशत पसरवली होती. १९९० मध्ये यासिन मलिकने इतर दहशतवाद्यांसह हवाई दलाच्या अधिकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार (Firing) केला होता. या हल्ल्यात चार अधिकारी ठार झाले तर ४० जण जखमी झाले होते. शहीद झालेल्यांमध्ये स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना यांचाही समावेश होता. रवी खन्ना यांच्या शरीरावर २६ गोळ्यांच्या खुणा आढळल्या होत्या.

रवी खन्ना यांची पत्नी निर्मल खन्ना यांनी यासिन मलिकला (Yasin Malik) फाशी देण्याची मागणी केली होती. मात्र, बुधवारी दिल्लीतील एनआयए न्यायालयाने यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावली. यासोबतच न्यायालयाने दहा लाखांचा दंडही ठोठावला आहे. यासिन मलिकच्या बचावात बोलणाऱ्यांवर निर्मल म्हणाल्या की, या लोकांच्या भरवशावर ज्यांची दुकाने सुरू आहेत त्यांना धक्का बसला असेल.

तेव्हा मला वाईट वाटले

माझ्या पतीला मारूनही तो ३२ वर्षे फिरत राहिला त्याला आणखी काय हवे आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना माझे प्रेरणास्थान मानत असे. परंतु, जेव्हा ते यासिन मलिक यांना भेटले तेव्हा मला वाईट वाटले, असेही निर्मल खन्ना पुढे म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments